प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे

प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे

4  
प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीती हेवा करत नाही; प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही

5  
ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही

6  
ती अनीतीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते

7  
ती सर्वकाही सहन करते, सर्वकाही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते.

8  
प्रीती कधी अंतर देत नाही; संदेश असले तरी ते संपतील. भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील; आणि विद्या असली तरी ती संपेल.

9  
कारण आपल्याला केवळ अंशतः कळते, आणि अंशतः संदेश देता येतो

10  
पण जे पूर्ण ते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल.

11  
मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत; आता प्रौढ झाल्यावर मी पोरकटपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत.

12  
कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते; परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे; पण नंतर, मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे, मी पूर्णपणे ओळखीन.

13  
सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत; परंतु त्यांत प्रीती श्रेष्ठ आहे.

1 Corinthians 13 in Marathi

1 Corinthians 13 in English

This post is also available in: पोर्तुगीज अरबी बेलारशियन बंगाली बल्गेरियन डॅनिश फिन्निश जॉर्जियन ग्रीक हिंदी हंगेरियन मलय मंगोलियन नेपाळी नॉर्वेजियन पोर्तुगीज (पोर्तुगाल) सिंहला स्लोव्हाक स्वाहिली स्वीडिश तमिळ तेलगू तुर्की झुलू झेक मल्याळम स्पॅनिश (स्पेन) Lithuanian पंजाबी गुजराती मॅसेडोनियन अम्हारिक उझ्बिक

CategoriesUncategorized