स्तोत्रसंहिता 23: परमेश्वर माझा मेंढपाळ आहे

1  
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही.

2  
तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो; तो मला संथ पाण्यावर नेतो.

3  
तो माझा जीव ताजातवाना करतो; तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो.

4  
मृत्युच्छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस; तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात.

5  
तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस; तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस; माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे.

6  
खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील; आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.

Psalm 23 in Marathi

Psalm 23 in English