स्तोत्रसंहिता 91 – सर्वसमर्थाच्या पंखांखाली आश्रय

1  
जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.

2  
परमेश्वराला मी “माझा आश्रय, माझा दुर्ग” असे म्हणतो; “तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो.”

3  
कारण तो पारध्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करील.

4  
तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखांखाली तुला आश्रय मिळेल; त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे.

5  
रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण

6  
काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, ह्यांची तुला भीती वाटणार नाही.

7  
तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही

8  
मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल, आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल.

9  
कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहेस

10  
म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही.

11  
कारण तुझ्या सर्व मार्गांत तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल.

12  
तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरतील.

13  
तू सिंह व नाग ह्यांच्यावर पाय देऊन चालशील; तरुण सिंह व अजगर ह्यांना तुडवत चालशील.

14  
माझ्यावर त्याचे प्रेम आहे, म्हणून मी त्याला मुक्त करीन; त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन.

15  
तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याजवळ राहीन; मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन

16  
त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन; त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन.

स्तोत्रसंहिता 91

Psalm 91 in English

ख्रिस्ती मनुष्याची शस्त्रसामग्री

इफिसकरांस पत्र 6:10-18

10  
शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा.

11  
सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा.

12  
कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकार्‍यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.

13  
ह्या कारणास्तव तुम्हांला वाईट दिवसांत प्रतिकार करता यावा व सर्वकाही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री घ्या.

14  
तर मग आपली कंबर सत्याने कसा; नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा

15  
शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा

16  
आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हांला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा.

17  
तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन, ही घ्या.

18  
सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा.

Ephesians 6 in Marathi

Ephesians 6 in English

प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे

प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे

4  
प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीती हेवा करत नाही; प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही

5  
ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही

6  
ती अनीतीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते

7  
ती सर्वकाही सहन करते, सर्वकाही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते.

8  
प्रीती कधी अंतर देत नाही; संदेश असले तरी ते संपतील. भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील; आणि विद्या असली तरी ती संपेल.

9  
कारण आपल्याला केवळ अंशतः कळते, आणि अंशतः संदेश देता येतो

10  
पण जे पूर्ण ते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल.

11  
मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत; आता प्रौढ झाल्यावर मी पोरकटपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत.

12  
कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते; परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे; पण नंतर, मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे, मी पूर्णपणे ओळखीन.

13  
सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत; परंतु त्यांत प्रीती श्रेष्ठ आहे.

1 Corinthians 13 in Marathi

1 Corinthians 13 in English

आता आपली मुले मराठी मधील बालमित्रांसाठी पवित्र शास्त्र अ‍ॅपचा अनुभव घेऊ शकतात!

बालमित्रांसाठी बायबल अ‍ॅप

आज आमच्या भागीदार OneHope यांच्यासोबत एकत्रित रीत्या, आम्ही लहान मुलांसाठी बालमित्रांसाठी पवित्र शास्त्र अ‍ॅप मराठी मध्ये करतांना अत्यंत आनंद होत आहे. आता, पूर्वीपेक्षा जास्त मुलांना स्वतःच्या बायबलचा अनुभव घेण्याची संधी मिळाली आहे.

अ‍ॅपच्या सेटिंग्जमध्येच निरनिराळ्या भाषां बदलणे सोपे आहे:

  1. आपण आपला अ‍ॅप अलिकडेच रीलिझ झालेली आवृत्तीतअद्यतनित केला असल्याचे सुनिश्चित करा.
  2. अ‍ॅप उघडा भाषा सेटिंग्ज उघडण्यासाठी गियरचे चिन्ह टॅप करा (गियर चिन्ह).
  3. भाषा टॅप करा आणि आपणास पाहिजे असलेली भाषा निवडा.

ऑडिओ आता त्या भाषेत प्ले होईल आणि त्या भाषेत सर्व मजकूर देखील दिसेल!

कृपया आम्हाला ही चांगली बातमी साजरे करण्यात मदत करा!

फेसबुकफेसबुक वर सामायिक करा

ट्विटरट्विटर वर सामायिक करा

ईमेलईमेलद्वारे सामायिक करा


बालमित्रांसाठी बायबल अ‍ॅप येशू

बालमित्रांसाठी बायबल अ‍ॅप बद्दल

OneHope सह भागीदारीत विकसित, बालमित्रांसाठी पवित्र शास्त्र अ‍ॅप हे YouVersion, बायबल अॅप निर्माते आहेत. मुलांना स्वतः बायबलचा सर्व आनंददायी अनुभव देण्यासाठी बनविलेल्या, बालमित्रांसाठी पवित्र शास्त्र अ‍ॅप यापूर्वीच 39 दशलक्ष अॅपल, अँड्रॉइड आणि किंडल डिव्हाइसवर इंस्टॉल केले गेले आहे आणि ते नेहमीच विनामूल्य आहे. जगातील सर्व मुले आता 54 भाषांमध्ये मुलांसाठी बायबल अ‍ॅपचा आनंद घेत आहेत – आता मराठीत देखिल उपलब्ध!

App Store Google Play Amazon

नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना

नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना

2  
माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना.

3  
तुम्हांला ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो

4  
आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्यासाठी की, तुम्ही कशातही उणे न होता तुम्हांला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी.

5  
जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो

6  
पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे; कारण संशय धरणारा वार्‍याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे.

8  
असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यांत चंचल असतो. आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये.

8  
असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यांत चंचल असतो. आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये.

9  
दीन स्थितीतील बंधूने आपल्या उच्च स्थितीविषयी अभिमान बाळगावा

10  
आणि धनवानाने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा; कारण तो ‘गवताच्या फुलासारखा’ नाहीसा होईल.

11  
सूर्य तीव्र तेजाने उगवला व त्याने ‘गवत कोमेजवले, मग त्याचे फूल गळाले,’ आणि त्याच्या रूपाची शोभा गेली; ह्याप्रमाणे धनवानही आपल्या उद्योगाच्या भरात कोमेजून जाईल.

12  
जो माणूस परीक्षेत ‘टिकतो तो धन्य,’ कारण आपणावर प्रीती करणार्‍यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट, परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल.

James 1 in Marathi

James 1 in English